जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा पिडीसीए संघावर दणदणीत विजय

जळगाव : जळगांव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे काल व आज जळगांव संघाचा अंतिम साखळी सामना पि डी सी ए पुणे यांच्या विरुद्ध खेळण्यात आला. एम.सी. ए च्या सर्वोच्च समिती सदस्य श्री सुशील शेवाळे यांचा सत्कार सचिव श्री अरविंद देशपांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यानंतर अरविंद देशपांडे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली पी डी सी ए पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु पुणे संघा हा निर्णय जळगावच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला व पुणे संघ  केवळ २०.५षटकात सर्व गडी बाद ८५ धावा करू शकला, त्यात सुधाकर भोईटे २८ व सुजित उबाळे २० आणि संकेत हांडे यांनी १० धावा केल्या  गोलंदाजीत जळगांव संघातर्फे शुभम शर्मा व ऋषभ कारवा यांनी प्रत्येकी तीन आणि जेसल पटेल यांनी दोन गडी बाद केले. प्रतिउत्तरात जळगांव संघाने ५५.२ षटकात सर्व गडी बाद ३१३ धावा केल्या त्यात तनेश जैन ८४ शुभम शर्मा ६४ आणि साहिल गायकर यांनी ४६ धावा केल्या आणि जळगांव संघाने पुणे संघावर २२८ धावांची महत्वपूर्ण विजयी आघाडी घेतली. पुणे संघातर्फे गोलंदाजीत योगेश चव्हाण तिन व गौरव जोटशी आणि अमित पवार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

२२८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या  पुणे संघाचा दुसरा डाव केवळ ३४.३ षटकात फक्त १४२ धावात गारद झाला. गोलंदाजीत जळगाव संघातर्फे राहूल निमभोरे पाच जगदीश झोपे तिन जेसल पटेल आणि ऋषभ कारवा प्रत्येकी एक गडी बाद केले आणि हा सामना जळगांव संघाने एक डाव  ८६ धावांनी जिंकला व बोनस गुणा सहित सात गुण कमवीत आपल्या गटात दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला व अव्वल साखळी फेरीसाठी पात्र ठरला आहे. या सामन्यात पंच म्हणून घनःश्याम चौधरी आणि संतोष बडगुजार व गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पाहिले. विजयी संघाचे जलगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व संपूर्ण कार्यकारणी मंडळाने अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here