पोलिस असल्याची बतावणी करत सेल्समनची फसवणूक

जळगाव : पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध सेल्समनची 28 हजारात फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 हजार रुपये रोख आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐवज पोलिस असल्याची बतावणी करणा-याने वृद्ध सेल्समनकडून शिताफीने पळवून नेला आहे. रघुनाथ बाबुराव अंबुसकर (रा. कस्तुरी सुपरशॉपच्या मागे पिंप्राळा- जळगाव) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

रघुनाथ अंबुसकर हे 1 एप्रिल रोजी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात असतांना एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. आपण पोलिस असल्याची बतावणी करत त्याने तुमच्याकडील गांजा चेक करायचा आहे असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान रघुनाथ अंबुसकर यांच्याकडील 18 हजार रुपये रोख आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण 28 हजार रुपयांचा ऐवज काढून नेला. हे.कॉ. मनोज पवार हे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here