चोरीच्या मोटार सायकलसह अट्टल चोरटा गजाआड

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत अट्टल गुन्हेगाराकडून चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. दिपक सुमा-या बारेला (रा. कर्जाणा ता. चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला चोपडा येथून अटक करण्यात आली आहे.

अटकेतील दिपक बारेला याच्याकडून चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याने दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुका, धरणगाव आणि भडगाव पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी त्याला जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.  स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ.संदिप पाटोल, पोहेकॉ. अशरफ शेख, दिपक पाटील, पोना प्रविण मांडोळे, पो.कॉ. परेश महाजन, हेमंत पाटील, चालक पो.कॉ. प्रमोद ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here