विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग – भुसावळला गुन्हा दाखल

जळगाव : स्पर्धा परिक्षा केंद्रात शिकवणा-या शिक्षकाने क्लासमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना भुसावळ शहरात घडली. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक पाल असे शिक्षकाचे नाव आहे.

भुसावळ शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात स्पर्धा परिक्षा केंद्र चालवण्याचे काम अभिषेक पाल नावाचा शिक्षक करतो. अभिषेक पाल या शिक्षकाने त्याच्या क्लासमधील एक विद्यार्थीनी मैदानावर रनिंगचा सराव करत होती. त्यावेळी त्याने तिला विवादास्पद स्पर्श केला. याशिवाय ती विद्यार्थिनी क्लासमधे असतांना तिच्या संमतीविना तिच्यासोबत मोबाईलमधे सेल्फी फोटो घेतला. याशिवाय फ्लाईंग किसचे हातवारे केल्याने त्या विद्यार्थीनीच्या मनात लज्जास्पद अवघड स्थिती निर्माण झाली.

हा प्रकार एवढ्यावरच न थांबवता त्याने तिला माझ्यासोबत कॉफी पिण्यास चल असे म्हटले. वेळोवेळी घडत गेलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थीनीने भुसावळ शहर गाठत अभिषेक पाल या शिक्षकाविरुद्ध गु.र.न. 43/23 भा.द.वि. 354, 354 अ या कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार मोहम्मद सैय्यद करत आहेत.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here