जमावाच्या मारहाणीत वनविभागाचे कर्मचारी जखमी

जळगाव : अतिक्रमण काढण्यास विरोध करणा-या जमावाकडून झालेल्या मारहाणीत वन विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. आरडाओरड, दगडफेक आणि जेसीबीचे नुकसान करणा-या लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपाल रविंद्र चिंतामण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर वन विभागाच्या हद्दीत गारबर्डी वनविभागाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम 4 मे रोजी सुरु होती. दरम्यान या मोहिमेला जमावाकडून विरोध सुरु झाला. यावेळी आरडाओरड व दगडफेक करुन अतिक्रमणअतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या जेसीबीचा काचा व हेडलाईट फोडून नुकसान करण्यात आले. चालक दिलीप बारेला यांच्या हाताला सुनिल गौड यांच्या डोक्याला व दोन्ही हातांना तसेच यावलचे आगाररक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांच्या हाताला यावेळी दुखापत झाली. सुमारे बत्तीस जणांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 177/23 भा.द.वि. 363, 332,336, 337, 341, 143, 147, 148, 149, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.       

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here