महिलेवर बलात्कार करणा-यास अटक

जळगाव : महिला घरात एकटी झोपली असल्याची संधी साधून तिच्या घरात प्रवेश करुन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आरिफ शेख जाबीर असे फैजपूरच्या इस्लामपुरा परिसरात राहणा-या व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

फैजपूर येथील महिला घरात रात्रीच्या वेळी एकटी असल्याचे बघून शेख आरीफ याने तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. 2 मे च्या रात्री घडलेल्या या घटने प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार  फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मोहन लोखंडे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here