धुम स्टाईल मोबाईल हिसकावणारा जेरबंद

जळगाव : पायी चालतांना मोबाईलवर बोलणा-या नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून मोटार सायकलने पलायन करणा-या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी गावानजीक उमेश पार्क भागात राहणारा राहुल देखनाळे असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे. रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांच्या ताब्यातील चोरटा राहुल देखनाळे याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

राहुल देखनाळे याच्याकडे चोरीचे मोबाईल असुन ते मोबाईल तो विकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पोलीस अंमलदार विजयसिंग धनसिंग पाटील, सुधाकर रामदास अंभोरे, जितेंद्र राजाराम पाटील, अकरम याकुब शेख, महेश आत्माराम महाजन, नितीन प्रकाश बाविस्कर, प्रीतम पिंतांबर पाटील, विजय शामराव पाटील, संदीप श्रावण सावळे, ईश्वर पंडीत पाटील, उमेशगिरी गोसावी आदींना तपासकामासह कारवाईकामी रवाना केले.

गुप्त बातमीदाराकडून माग काढत तपास पथकाने संशयीत राहुल देखनाळे यास मोहाडी परिसरातील उमेश पार्क परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंगझडतीदरम्यान ओपो कंपनीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यातआले. आपल्या साथीदाराच्या मदतीने धुम स्टाईल मोटार सायकलने दोन्ही मोबाईल जळगाव शहरातून पाच ते सात महिन्यापुर्वी पायी चालणा-या नागरिकांच्या हातातून हिसकावले असल्याचे त्याने कबुल केले. पुढील कारवाईकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here