भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): भरदिवसा घरफोडी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा चो-या घरफोड्या  करणा-या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात जळगाव  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला यश आले आहे. 

जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे (सर्व राहणार मोहाडी ता. जामनेर), आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (सर्व रा.नांद्रा ता. पाचोरा), अमोल सुरेश चव्हाण रा. सामनेर ता. पाचोरा अशी घरफोड्या करणा-या गॅंग सदस्यांची नावे उघडकीस आली आहेत. यापैकी जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील आणि पवन उर्फ पप्पु सुभाष पाटील हे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस पथक तिघा फरार गुन्हेगारांच्या मागावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील घरफोडीचे तब्बल 31 गुन्हे उघडकीस आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या उघडकीस आलेल्या गुन्ह्यात निष्पन्न झालेले सातही जण त्यांच्या कडे असलेल्या कारला वेगवेगळ्या नंबर प्लेट लावून फिरत असल्याचीमाहिती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्याअख्त्यारीत पथकांची निर्मीतीकरण्यातआली होती.

सर्व प्रथम सागर लक्ष्मण देवरे, आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. अधिक चौकशीअंती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे, आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे असे सर्वजण गेल्या दोन ते तिन वर्षापासून गटागटाने चो-य घरफोड्या करण्यासाठी स्विफ्ट डीझायर, क्रेटा तसेच आर्टीगा अशा चारचाकी वाहनांचा वापर करत होते. गुन्हा करतांना हे गुन्हेगार त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनांची वेगवेगळ्या पासिंगची नंबर प्लेट वेळोवेळी बदलत होते.

जळगाव जिल्हात विशेषत: जळगाव शहर, भुसावळ व चाळीसगाव येथे तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यांमध्ये भरदिवसा विशेषत अपार्टमेंटमध्ये घरफोडी केली जात होती. बंद असलेल्या घरांचे कुलूप त्यांच्या कडील हत्याराने तोडून या टोळीने अनेक घरफोड्या केल्या असल्याची कबुली ताब्यातील अट्टल गुन्हेगारांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातुन तिन लाख रुपयांची रोख रक्कम, चांदीचे दागिने, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारे विविध हत्यारे, एक गावठी कट्टा व चारचाकी वाहनांच्या वेगवेगळ्या पासिंगच्या चोवीस नंबरप्लेट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

घरफोडीत मिळालेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी त्यांना अमोल सुरेश चव्हाण (रा. सामनेर ता. पाचोरा) याने मदत केली आहे. या दागिन्यांपैकी काही दागिने अमोल चव्हाण याने वेळोवेळी त्याच्या ओळखीचे योगेश हनुमंत मोरे (लक्ष्मी ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव तसेच संकेत शशिकांत देशमुख (स्वस्तीक ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव यांना विकले असल्याचे कबुल करण्यात आले आहे. दागिने चोरीचे असल्याचे माहिती असून देखील दुकानदारांनी ते विकत घेत होते अशी माहीती पुढे आली आहे.

जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील (सर्व रा. मोहाडी ता. जामनेर) हे तिघे त्यांच्या ताब्यातील वाहनांसह फरार झाले आहेत. ते पकडले गेल्यास त्यांच्याकडून अजुन बरेच गुन्हे उघडकीस येणार असल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे. तसेच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या दुकानदारांची नावे समोर येवू शकतात असेही म्हटले जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, अमोल देवढे, सहायक फौजदार युनुस शेख, रवी नरवाडे, अनिल जाधव, हे.कॉ. राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनिल दामोदरे, संदिप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, दिपक पाटील, पोना संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रविण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी (सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच मुख्यालयातील कर्मचारी करुणासागर अशोक जाधव आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here