डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळूच्या मुद्द्यावर वातावरण तापले असतांना वाळूवर गाडी पार्कींग करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात महिलेने डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. धरणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्र येथे पाळधी गावातील डॉक्टर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळधी येथील महिलेच्या तक्रारींनुसार तिच्या वाळूवर डॉक्टर आपले वाहन पार्कींग करत असतो. तुम्ही आमच्या वाळूवर गाडी पार्क करत जावू नका. त्यामुळे आमच्या वाळूचे नुकसान होते असे महिलेने डॉक्टरला हटकले. महिलेने हटकल्याचा राग डॉक्टरला आला. रागाच्या भरात डॉक्टरने तिला अतिशय खालच्या स्तरावर जावून छि…..ल, वगैरे बोलून तुला जास्त माज आला आहे. मी काय चीज आहे……. असे बोलून तिच्या कानशिलात लावल्याचा महिलेचा आरोप आहे.

आपला विनयभंग झाल्यामुळे महिला पोलिस दूरक्षेत्र येथे तक्रार देण्यासाठी जात असतांना तु माझ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कशी जाते असे म्हणत तिची साडी ओढल्याचे महिलेचे म्हणणे आहे. या घटनेप्रकरणी स.पो.न. प्रमोद कठोरे पुढील तपास करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here