दिपमाला चौरे एसीबीच्या जाळ्यात

dipamala choure

जळगाव : जळगावच्या प्रांताधिकारी दिपमाला चौरे व त्यांचा लिपीक अतुल सानप या दोघांना आज एसीबीच्या पथकाने अटक केल्याची घटना घडली. तक्रारदार यांचा वाळूचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना असतांना सदर वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडले होते.

ते दोन ट्रक एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या आवरात उभे करण्यात आले होते. हे दोन्ही ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्या वतीने त्यांचा लिपीक अतुल अरुण सानप याने तक्रारदारास दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती सव्वा लाख रुपये देण्याघेण्याचे ठरले होते. ही लाचेची रक्कम लिपीक अतुल सानप यांच्या खासगी पंटरने स्विकारली. हा कारवाईचा सापळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आला व यशस्वी झाला.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here