वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांमार्फत स्वॅब घेण्यात यावे मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे यांची मागणी

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांमार्फत स्वॅब घेण्यात यावे मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे यांची मागणी

जळगाव : : कोविड-१९ रूग्णांचे स्वॅब हे केवळ नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टर अथवा वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षक पदवीधरांमार्फतच घेण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी केली जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अवर सचिव अमीत बिस्वास यांच्या सहीनिशी असलेले पत्र सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना ८ एप्रिल २०२० रोजी पाठवले आहे. त्या पत्राची प्रत अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रासोबत जोडलेली आहे.त्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की कोविड-१९ रूग्णांचे स्वॅब घेण्यासाठी नाक, कान, घसा तज्ञ अथवा वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षक पदवीधर यांच्या मार्फत घेण्यात यावे. त्यामुळे या स्वॅबचे योग्य ते अचूक परीणाम येतील.

जळगांव जिल्ह्यात मात्र या आदेशाच्या वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. हिवताप विभाग व जि.प. विभाग यांच्या आरोग्य सेवकांना कोवीड रुग्णांचे स्वॅब घेण्याचे काम देण्यात आले आहे. आरोग्य सेवक हा केवळ दहावी पास असतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक शिक्षणाचा अनुभव नसतो. त्यामुळे निगेटिव्ह रूग्ण व पॉझीटिव्ह रूग्ण यांच्यातील परीक्षणाचा निकाल चुकण्याची दाट शक्यता असते.

त्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावली प्रमाणे तज्ञ डॉक्टरांच्या नियमावलीनुसार तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते स्वॅब चाचणी व्हावी तसेच कोविड-१९ रूग्णांचे योग्य परीक्षण होण्याची मागणी अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी आपल्या निवेदनद्वारे जिल्हाधिकरी यांना केली आहे.

जळगांव जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवक व आशा वर्कर महिला यांच्यामार्फत सर्व्हेक्षण केले जात आहे. असे असले तरी ज्या गावात पॉझीटिव्ह रूग्ण सापडतात त्यांच्या आजुबाजुच्या घरातील नागरिक सर्व्हेक्षण करतांना विरोध करत असल्याचे देखील अ‍ॅड. जमील देशपांडे यांनी पुढे म्हटले आहे. या या आशा वर्कर व आरोग्य सेवकांना काही नागरिक शिवीगाळ व धमकी देण्याचे देखील प्रकार समोर आले आहेत.

त्यामुळे आरोग्य सेवक व आशा वर्कर यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगांव, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगांव तसेच जिल्हा हिवताप अधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here