कारला बॉलसारखे उडवत ट्रक घुसला हॉटेलमध्ये

धुळे : मुंबई – आग्रा महामार्गावरील पळसनेर नजीक ब्रेक फेल झालेल्या एका ट्रकने थेट एका हॉटेलला धडक दिली. आज सकाळी झालेल्या या घटनेत खडी भरलेल्या या ट्रकने एका कारला जणूकाही चेंडू सारखे उडवले. त्यानंतर हा ट्रक थेट हॉटेलमधे जावून आदळला. या भिषण अपघातात 28 जण जखमी तर नऊ जण जागीच ठार झाले आहेत. हा ट्रक इंदोर येथून शिरपूरच्या दिशेने बांधकामाची खडी घेऊन येत होता.

या भिषण अपघातात ट्र्क चालक जागीच गतप्राण झाला. अपघात झाल्यानंतर अनेक जण ट्रकमधील खडीच्या खाली दबले गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. धडक दिलेल्या कारमधील शुभम गणेश खंडेलवाल (26) हा तरुण जखमी झाला आहे. सुनिता राजेश खंडेलवाल (गणपती मंदीराजवळ पंचवटी गॅस एजन्सीनजीक धुळे) यांचा मृत्यू झाला आहे. या भिषण अपघातात अनेकांचे हातपाय आणि इतर अवयव धडावेगळे झाल्याचे भिषण दृश्य दिसून येत होते. अपघात ग्रस्तनऊ जणांना शिरपूरच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात स्कुल बसला देखील धडक बसली मात्र बसमधील विद्यार्थी सुदैवाने बचावल्याचे समजते.       

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here