आजचे राशी भविष्य (12/7/2023)

आजचे राशी भविष्य (12/7/2023)

मेष : राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.

वृषभ : क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

मिथुन : एखादा विवाह जुळण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल.पत्नीस दिलेली वचने पाळाल.

कर्क : बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह : आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कन्या : कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.

तूळ : अथक मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. भावंडांत सलोखा राहील.

वृश्चिक : सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहिणींना समारंभात मानपान मिळेल.

धनू : आज संयमाची गरज असून घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांनी आज्ञेत राहावे.

मकर : हातचे सोडून पळत्याच्या मागे धाऊ नये. गृहिणींना चांगला दिवस राहिल.

कुंभ :अपुरी स्वप्ने साकार होतील. विरोधकही शरण येतील.

मीन : उद्योग-व्यवसायात प्रगतीरथ वेगवान राहील. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here