एसटी चे दहा प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह

औरंगाबाद : एसटी बसने औरंगाबादला आलेल्या २६१ प्रवासी वर्गाची शनिवारी प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत दहा प्रवासी पॉझिटिव्ह आढळले.
गेल्या पाच महिन्यापासून एसटीची चाके जागच्या जागी खिळून होती. 20 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास, वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यामुळे एसटी बसच्या प्रवासी वाहतुकीस थोडा फार प्रतिसाद मिळत आहे.

रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून अँटिजन तपासणी केली जात होती. आता एसटीने येणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी सुरु करण्यात आली आहे. औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी आलेल्या प्रवाशांची तपासणी मनपाच्या वैद्यकीय पथकाकडून करण्यात आली. या तपासणीत दहा प्रवासी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तपासणी करण्यासाठी काही प्रवाशांनी विरोध केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here