पत्रकाराच्या अंगावर वाहन नेत जीवे ठार करण्याचा प्रयत्न

जळगाव : विना क्रमांकाचे गौण खनीज व मुरुम वाहून नेणा-या ट्रॅक्टरला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करणा-या पत्रकाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना क्रमांकाचे गौण खणीज वाहतूक करणा-या ट्रॅक्टर चालकाची माहिती मोबाईलद्वारे तहसीलदारांना देत असल्याचा राग आल्याने हा प्रकार घडला आहे. या घटनेत भडगाव येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी शेख शकील शेख बाबू हे जखमी झाले आहेत.

या घटनेत वसीम खान याने पत्रकार शेख शकील यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. दरम्यान फैजन खान याने शेख शकील यांना पकडून ठेवले. वसीम खान याने शेख शकील यांच्या डोक्यावर टॅमी मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून शेख शकील यांनी आपला बचाव केला. दरम्यान वसीम खान, कादीर खान हाजी जोरावर आणि रशीद खान बाबू खान अशा तिघांनी शेख शकील यांना मारहाण करुन चिथावणी दिली. वसीम खान याने पुन्हा ताब्यातील ट्रॅक्टर शेख शकील यांच्या अंगावर घालून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने शेख शकील यांच्या हाता पायाला मार लागला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here