घरगुती गॅस वाहनात भरणारे दोघे ताब्यात

जळगाव : घरगुती गॅस काळया बाजारात वाहनांमधे भरणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्यापथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. शाकीब खान सलीम खान (रा. काट्या फाईल शनीपेठ, जळगाव) आणि फारुख रऊफ खाटीक (रा. न्यू फेडरेशन, प्रिंप्राळा हुडको जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. दोघांकडून वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य देखील हस्तगत करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.,नि.किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शंनाखाली स.पो.नि. निलेश राजपूत, पोलीस उप निरीक्षक गणेश मारे हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख महेश महाजन लक्ष्मण पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, प्रितम पाटील, किरण धनगर, विजय पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here