सोने चांदीचे बदलते दर आणि अर्थव्यवस्था

सोने चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी घसरण झाल्याचे चित्र आपणास दिसून आले. सोन्याचे दर अस्थिर असले तरी लग्नसमारंभासाठी सोन्याचे दागिने घ्यावेच लागतात. सोन्याचे भाव वाढल्यामुळे अनेक जणांनी लग्नसोहळे लांबणीवर टाकले. काही जणांनी आहे तेवढ्याच बजेट नुसार सोन्याची खरेदी केली. सोन्याचे भाव वाढणार म्हणून कित्येकांनी घाईगर्दीत सोन्याची खरेदी केली होती. मात्र आता सोन्याचे भाव घेतल्या किमतीपेक्षाही कमी किमतीत मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सोने खरेदीचा विचार करत असाल तर आता “वेट अ‍ॅंड वाच” हि भुमिका घेणे योग्य राहील असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात सोने व चांदीच्या दरात जवळपास हजार रुपयांची घसरण झाली आहे. आता सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमसाठी 52000 रुपये तर चांदी प्रती किलोसाठी 62 हजार रुपये एवढी आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते सोने व चांदीचे दर अजून घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक स्तरावर सुरु असलेल्या अर्थ व्यवस्थेतील बदलाचा परिणाम आपल्या देशात देखील होत आहे. सध्या प्रत्येक जण कोरोना संकटातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतांना सोन्यातील गुंतवणूक घटत असल्याचे दिसून येत आहे. 5 ऑगस्ट रोजी चांदी 74000 तर सोने 6 ऑगस्टला 58 हजाराच्या जवळपास होती आगामी काळात सोने व चांदीच्या दरात अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोने साधारण 48 हजार तर चांदी 55 हजार रुपयांच्या जवळपास जावू शकते. याचे कारण म्हणजे अनेक देशात पुढील महिन्यात कोरोनाची लस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लसीची अंतीम चाचणी प्रगतीपथावर आहे. त्यामुळे बाजारातील सुस्ती बदलण्याची शक्यता आहे. अशावेळी लोक सोन्यासह इतर क्षेत्रात देखील गुंतवणूक करु शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here