भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन/युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित “तरूणींची दहीहंडी” कार्यकारिणी

जळगाव – भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 14 वर्षांपासून जळगाव शहरातील मुख्य असणाऱ्या काव्यरतनावली चौक येथे तरूणींची दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 10 ते 12 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा गुरूवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सायंकाळी 4 ते रात्री 9.30 दरम्यान तरूणींची दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक असते. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध महाविद्यालयील विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहींहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी युवाशक्ती फाऊंडेशन प्रयत्नशील असते.

युवाशक्ती फाऊंडेशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक उपस्थित होते. यामध्ये गुरुवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे होणाऱ्या तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरवीण्यात आली. सदर उत्सवाचा हा १४वा वर्ष असून या महोत्सवात दही हंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येतो. यामध्ये अध्यक्ष-संस्कृती नेवे, उपाध्यक्ष-मेघना भोळे, सचिव-पियुष तिवारी, सहसचिव-हर्षल मुंडे, खजीनदार-अर्जुन भारुळे, सहखजीनदार-सागर सोनवणे, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख-तृषान्त तिवारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, संदिप सुर्यवंशी, तेजस श्रीश्रीमाळ, प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, अमोल गोपाल, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, प्रसन्न जाधव, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, जयेश पवार, भटू अग्रवाल, गोकुळ बारी , ओम पाटील, यश राठोड, सोमसिंग पाटील, वैभव मिस्त्री, देव खाचणे, धनेश भावसार, यश चौधरी, सुरज परदेशी, राहूल कोळी, सचिन सोनवणे, सुशांत येवले, हितेश पाटील, वेद झेंडे, आशिष ठाकरे, मयुर माळी, समिर शेख, शुभम पाटील, सिद्धेश भावसार, समिर कावडीया, सैफ मनसुरी, पवन चव्हाण, विपीन कावडीया, तोषल राजहंस, अजय खैरनार, विक्की शर्मा, विशाल सोनार, ऋषीकेश देशमुख, यश लोढा, जयेश नेवे, जंगलू गवळी, रोहीत वारके, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, करण शाहा, यश श्रीश्रीमाळ, बंटी शिंदे, सोहम नाईक, आदित्य पाटील, गणेश भोई, दर्शन कुमावत, राहूल शर्मा, समेध गाढे, तुळशीराम दांडगे, श्रेयस मुथा, प्रसन्न जाधव, विवेक जावळे, मनजीत जांगीड, विनोद सैनी, चैतन्य भंगाळे आदी.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here