तिघा ट्रक चोरट्यांना पोलिस कोठडी

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण परिसरातून मालट्रक चोरुन नेणा-या तिघा चोरट्यांना न्यायालयाने तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नवाज सादिक सैय्यद (रा. साईबाबा मंदीराजवळ, तांबापुरा जळगाव), शहजाद रशीद शेख (रा. रामरहिम कॉलनी जवळ, सेवा (मध्यप्रदेश) आणि अवेजखान जहागीरखान (रा. ईस्लामपुरा, गरीब नवाज नगर, नशिराबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आणि पोलिस कोठडीतील ट्रक चोरट्यांची नावे आहेत.  

दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत असलेल्या विशाल पेट्रोल पंपासमोर असलेल्या रत्नाकर नर्सरी परिसरातून एक ट्रक चोरीला गेला होता. वसीम अहमद सुलतान अहमद यांच्या मालकीच्या ट्रक चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी झालेल्या मालट्रकसह तिघांना चाळीसगाव रोड धुळे पोलिसांनी पकडली होती.

धुळे पोलिसांच्या ताब्यातून ट्रक आणि तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. अटकेतील तिघांना न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या अधिनस्त सहायक फौजदार  अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, जमील शेख, सुधीर साळवे, निलोफर सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, तसेच चाळीसगांव रोड धुळे पोस्टेचे पोलीस निरिक्षक धिरज महाजन, पोहेकॉ  एस सी पाथरवट, ए. व्ही. वाघ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील चोरट्यांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here