आजचे राशी भविष्य (22/09/2023)

आजचे राशी भविष्य (22/09/2023)

मेष : अनोळखी व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळेल. परिश्रमांचे चीज होवून कामे पूर्णत्वास जातील.

वृषभ : पैशाचा विनिमय काळजीपुर्वक करा. अती उत्साह चुकीचा ठरु शकतो.

मिथुन : मनोबल वृद्धिंगत होवून कामात उत्साह येईल. कौटुंबिक वातावरण सामान्य असेल.

कर्क : विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज. अपेक्षित यशप्राप्तीसाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल.

सिंह : व्यापारी वर्गाला आज नव्या अनुभवाला सामोरे जावे लागू शकते. एखादा करार पूर्ण होवू शकतो.

कन्या : आर्थिक आघाडीवरील मोठा निर्णय घेवू नये. नानाविध रंगांनी भारलेला दिवस राहील.

तुळ : ठामपणे योग्य तो निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात आजचा दिवस विशेष ठरु शकतो.

वृश्चिक : कठीण वाटणारी कामे सहज व सुलभतेने पार पडतील. कुठल्याही वादात पडू नका.

धनु : लोक संपर्कामधून फायदा होण्याची शक्यता. मतभेदाचे मुद्दे चर्चेतून सोडवले जावू शकतात.

मकर : कामाच्या नियोजनात व्यस्त राहाल. हाती घेतलेली नियोजित कामे पूर्णत्वास जातील.

कुंभ : वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण सुरु ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक ठरु शकतो.

मीन : कुणालाही विचार केल्याशिवाय वचन देवू नका. आहारावर नियंत्रण आवश्यक.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here