तीन मोबाईलसह चोरट्यास अटक

जळगाव : घरफोडी करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन मोबाईलसह अटक केली आहे. जळगाव शहराच्या सम्राट कॉलनी भागातील रहिवासी राकेश जगताप असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यापथकातील सहायक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, विजय पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here