जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात

जळगाव दि.१९ (प्रतिनिधी)– आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन  प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चोपडा, दोंडाईचा, धुळे, अकोला, बुलढाणा, खामगाव, मालेगाव, अमरावती या शहरा मधून २२४ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रिडा संघ चे अध्यक्ष श्री रजनीकांत कोठारी जी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर श्री मनोज आडवाणी जी,  शिल्पा इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर चे श्री राजकुमार मुनोत, श्यामली मॅट्रेस चे  श्री चंद्रकांत चौधरी व जळगाव जिल्ह्याचे पहिले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू  श्री सुनिल  रोकडे तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत कीर्ती मुनोत, अतुल देशपांडे, वलीद शेख, सुफियान शेख, साद मलिक, दीपिका ठाकूर , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी, उपविजयी व  उत्तेनार्थ खेळाडूंना बक्षीस म्हणून रू.८५०००/- चे रोख रक्कम,  मेडल, प्रमाणपत्र व श्यामली मॅट्रेस कडून गिफ्ट देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – विहान राहुल बागड
  उपविजयी –  प्रथम पराग नहाटा
उत्तेजनार्थ – आरव अमित दुडवे आणि कौस्तुभ संदेश पाटील

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –   ओवी अमोल पाटील
उपविजयी – श्रावणी विकास खैरनार
उत्तेजनार्थ – अद्विता संतोष पटोंड आणि ज्ञानेश्वरी अनिल पवार

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – रुद्र प्रेमसिंग राठोड
उपविजयी – हिमांशु प्रशांत चौधरी
उत्तेजनार्थ – जनक रवी अग्रवाल आणि सहील शाम लाड

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे
उपविजयी – ओवी अमोल पाटील
उत्तेजनार्थ – अनीका अमित चौधरी आणि श्रावणी विकास खैरनार

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अंशुल रविकांत जाधव
उपविजयी – प्रीतम राजेंद्र जैन
उत्तेजनार्थ – ऋतुराज सतीश देशमुख आणि आयुष गजानन कुलकर्णी

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – रुखमनी भटेजा
उपविजयी – श्रवरी संतोष पतोंड
उत्तेजनार्थ – तनिषा अनिल साळुंखे आणि अनन्या पुरुषोत्तम बोरनारे

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – प्रीतम राजेंद्र जैन आणि चाणक्य महेश सूर्यवंशी
उपविजयी – ऋषी छोटू मोरे आणि देवेंद्र पंकज पटेल
उत्तेजनार्थ – हिमांशू प्रशांत चौधरी आणि सिद्धेश अनिल पवार
 व
खान मोहम्मद हमजा आणि देशराज कीर्ती मनोज

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजयी –  उजेर रियाज देशपांडे
उत्तेजनार्थ – अर्णव निलेश निंबाळकर आणि दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –  आनंदी देशमुख
उपविजयी – स्वरा निलेश पाटील
उत्तेजनार्थ – जानवी संजय पाटील  आणि रुक्मणी भाटेजा

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उत्तेजनार्थ – देवेंद्र हरिचंद्र कोळी आणि अर्श रहीम शेख

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – मोहित भोजवानी आणि जैद नावेद देशमुख
उत्तेजनार्थ – अर्णव निलेश निंबाळकर आणि केशव संजय वर्मा व
रौनक नितीन चांडक आणि देव देविदास वेद

पुरुष एकेरी
विजयी – चिराग गौतम शहा
उपविजयी – देवेश चंद्रकांत पाटील
उत्तेजनार्थ – घनश्याम प्रमोद पाटील व उमेर रियाज देशपांडे

महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील
उपविजयी – गीता अखिलेश पंडित
उत्तेजनार्थ – आनंदी देशमुख व मनाली महिपाल बोरा

पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि निखिल प्रवीण मराठे
उपविजयी – वलीद फैजल शेख आणि देवेश चंद्रकांत पाटील
उत्तेजनार्थ – वेद विजयबाहेती आणि चिराग गौतम शहा व अर्श रहीम शेख आणि तुषार उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – तनुज शर्मा
उपविजयी – सचिन विष्णु बस्ते
उत्तेजनार्थ – विनायक बालदी व तुषार उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – विनायक बालदी आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – अतुल ठाकूर आणि सचिन विष्णू बसते
उत्तेजनार्थ -डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा व अमोल प्रताप सिंग पाटील आणि सुभाष तोतला

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – मनाली अमित चौधरी आणि कीर्ती मोतीलाल मुनोत
उत्तेजनार्थ – संदीप कुमार पाटील आणि शितल अविनाश भोसले व विनायक बालदी आणि प्रज्ञा राजपूत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून वलिद शेख, सुफियान शेख, साद मलिक, ओजस सोनवणे, देवेश पाटील, गीता पंडित, शुभम चांदसरकर, देव वेद, प्रणेश गांधी, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत दिपिका ठाकूर, मो. हमजा खान,  पुनम ठाकूर, राखी ठाकूर, सुमिती ठाकूर,  फाल्गुनी पवार, कोनीका पाटील, कृष्णन घुमलकर, ईशांत साडी, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी  प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया व गीता पंडीत यांनी केले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व हॉटेल प्रेसिडेंट चे मालक श्री मनोज आडवाणी यांनी केले व  शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here