ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

जळगाव दि.२४ प्रतिनिधी –  येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धा दि. २३ ला पार पडली. या स्पर्धेत  प्रगती विद्या मंदीर शाळेचा विद्यार्थी व शाहुनगरमधील हनुमान आखाडा व्यायामशाळेचा पैलवान चि. हर्षित मनिष झेंडे हा ७१ किलो वजनी गटात व ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांकाने विजयी झाला.

या स्पर्धेच्या गटात प्रत्येकी दोन राऊंड झाले व दोन्ही राऊंड मध्ये हर्षित झेंडे या पैलवानने जिंकून अंतिम फेरीत विजय मिळवला. आता त्याची दि. २४ ते २७ दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेसाठी निवड झाली असून तो त्या स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे रवाना झाला आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या एक्सपोर्ट मार्केटिंग विभागाचे सहकारी मनिष झेंडे यांचा हर्षित चिरंजीव आहे. यशस्वी कामगिरीसाठी त्याला गुरु वस्ताद विजयदादा वाडकर, शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यातील विजयी कारकीर्दीस त्याला कुटूंबिय, हनुमान आखाड्याचे विजयदादा वाडकर व समस्त पैलवान मित्रमंडळीतर्फे, शाळेतील समस्त शिक्षकांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here