आजीला मारहाण, नातीचा विनयभंग, चिथावणी – तिघांविरुद्ध गुन्हा

On: September 28, 2023 9:12 AM

जळगाव : घरात अनाधिकारे प्रवेश करुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिच्या आजीला मारहाण तसेच आजीला ठार करण्याची चिथावणी या घटनक्रमातील तिघांविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंदुर्णी येथील राहणरे मयुर देवेंद्र गोढरी, देवेंद्र गोढरी आणि जळगाव येथील श्रीकांत सोनवणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

शेंदुर्णी येथील अल्पवयीन मुलगी रहात असलेल्या घरात मयुर गोढरी आणि देवेंद्र गोढरी या दोघांनी 22 सप्टेबर रोजी सायंकाळी अनाधिकारे प्रवेश केला होता. त्यावेळी मयुर याच्या मोबाईलवर श्रीकांत सोनवणे याने फोन करुन घरात कोण कोण आहेत अशी विचारणा केली. त्यावर मयुर याने श्रीकांत सोनवणे यास घरात पिडीत अल्पवयीन मुलगी आणि तिची आजी असे दोघे जण असल्याचे सांगितले. त्यावर पलीकडून फोनवर बोलणा-या श्रीकांत सोनवणे याने अल्पवयीन मुलीच्या आजीला मारुन टाका अशी चिथावणी दिली.

मयुर याने अल्पवयीन मुलीच्या आजीला लोखंडी पाईप खांद्यावर मारला. त्यात मुलीच्या आजीचा हात फ्रॅक्चर झाला. तसेच मयुर याने अल्पवयीन मुलीस पकडून तिच्या अंगाला स्पर्श करुन अंगलट केली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिलीप पाटील करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment