ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने हेल्पर ठार

जळगाव : पुढे जात असलेल्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने फैजपूर येथील इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज घडली. या घटनेप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक विनोद मेढे असे फैजपूर येथील मयत इसमाचे नाव असून तो ट्रकवर हेल्पर म्हणून काम करत होता.

शेख मझहर शेख अख्तर हा चालक देखील फैजपूर येथील रहिवासी असून तो गहूचा ट्रक रिकामा करण्यासाठी जळगाव येथील खानदेश फिलेरो या कंपनीत आला होता. दरम्यान ट्रक पुढे जात असतांना मागील चाकाखाली दिपक मेढे आल्याने त्याचा मृत्यू झाला. मयत दिपकचा भाऊ आतिश मेढे याने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

या अपघाताची माहिती समजताच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार संदीप सपकाळे, सुधीर साळवे, राहुल रगडे, दत्तात्रय कांबळे आदींनी मयतास लागलीच शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या अपघाताची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. याशिवाय चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here