साऊंड सिस्टीमचे साहित्य चोरी करणा-या चौघांना मुद्देमालासह अटक

जळगाव : साऊंड सिस्टीम व स्टेज डेकोरेशन करणा-या व्यावसायीकाचे साहित्य चोरुन नेणा-या चौघांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सागर राजाराम गवई (रा. पिंप्राळा हुडको जळगाव,  अमित खाटीक (रा. उस्मानिया पार्क जळगाव, समीर शेख इकबाल (रा. दुध फेडरेशन हुडको जळगाव आणि अमोल प्रकाश शिरसाठ (रा. दुध फेडरेशन हुडको जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.  

प्रदीप सुदाम वाणी यांचा साऊंड सिस्टीमसह स्टेज डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी आपले व्यवसायाचे साहित्य ठेवण्याकामी शिव कॉलनी परिसरातील एक घर घेतले होते. व्यावसायीक साहित्य ठेवलेल्या बंद घरातून त्यांचे साहित्य चोरी झाले होते. अज्ञात चोरट्यांविरुद्ध बंद घराचे कुलुप तोडून चोरी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंदाजे 1 लाख 11 हजार 600 रुपये किमतीचा सामान चोरी झाला होता.

रामानंद नगर पोलिस स्टेशनचे विठ्ठल पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. विठ्ठल पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी हेमंत संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.ना. रेवानंद साळुंखे, पोना हेमंत  कळसकर, पोना विनोद सुर्यवंशी, पोना अतुल चौधरी, पो. कॉ. उमेश पवार व पो. कॉ. रवींद्र चौधरी, पोकॉ.  जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक आदींनी शोध घेत चौघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. चौकशीअंती चौघा चोरट्यांनी आपला घरफोडीचा गुन्हा कबुल केला. त्यांच्या कब्जातून 1 लाख 6 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here