अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

जळगाव : चोपडा तालुक्यातील एक अल्पवयीन विद्यार्थिनी चोपडा शहरात शिक्षण  घेत असतांना तिची ओळख एका तरुणासोबत झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात व लग्नाच्या आमिषातून शरीर संबंधात झाले. या संबंधातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली.

सिडको पोलिस स्टेशन संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्हा चोपडा शहर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. चोपडा शहरातील संशयीत आरोपी तरुणाच्या घरी तसेच पंकजनगर परिसरातील गार्डनमधे हा चुकीचा प्रकार घडला. बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमानुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here