विनापरवाना लाकुड वाहतूकीवर कारवाई

On: November 9, 2023 7:03 PM

जळगाव : विना परवाना निंबाच्या लाकडाची वाहतुक करणा-या वाहनास चालकासह ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या गुन्हे शोध पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

8 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील नेरी नाका पांचाळ गल्ली नजीक छोटा हत्ती हे वाहन विना परवाना लाकडाची वाहतुक करत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील  सहायक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी घटनास्थळी जाऊन वाहनाची पाहणी केली. तपासणी दरम्यान या वाहनाद्वारे विना परवाना निंब झाडाच्या ओल्या लाकडांची वाहतुक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. वाहन चालक सैय्यद मुस्तकीन सैय्यद मुनाफ यास त्याच्या ताब्यातील वाहनासह ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईकामी त्याला वाहनासह वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment