महिला वकीलाच्या सासूचे बनावट अश्लिल फोटो व्हायरल

जळगाव : महिला वकीलाच्या सासूच्या फोटोला बनावट अश्लिल स्वरुप देत ते समाज माध्यमांमधे व्हायरल करणा-या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या सासूचे अश्लिल फोटो इन्स्टाग्राम व फेसबुक वर व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला वकीलाने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरात एका सधन उच्चभ्रु वस्तीत राहणा-या महिला वकीलाच्या सासूच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या फोटोसह अज्ञात व्यक्तीने अश्लिल मजकूर देखील व्हायरल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here