शालेय पोषण आहाराच्या किराणा मालावर चोरट्यांचा डल्ला

On: November 18, 2023 10:51 AM

जळगाव : शालेय पोषण आहारासाठी लागणा-या किराणा मालावर चोरट्यांनी डल्ला मारुन 24 हजार 220 रुपये किमतीचा माल लंपास केला आहे. या घटने प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुख्याध्यापकांनी गुन्हा दाखल केला आहे.

पारोळा शहरातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यानजीक कवीवर्य पद्मश्री ना. धो. महानोर प्राथमिक विद्यालय आहे. या विद्यालयातील खोली क्रमांक चार मधे शालेय पोषण आहारासाठी लागणारा किराणा माल भरुन ठेवण्यात आला होता. या खोलीच्या कडी कोंड्याचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून प्रवेश करुन चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हेड मास्टर राकेश पाटील यांनी पारोळा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास हे.कॉ. संजय पवार करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment