तरुणाच्या खूनातील दुस-या फरार संशयीत आरोपीस अटक

जळगाव : जळगाव शहरातील समता नगर परिसरातील तरुणाच्या खून प्रकरणातील दुस-या संशयीत आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अशोक महादु राठोड (रा.झाकिर हुसैन कॅालनी,संत गाडगेबाबा चौक, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या घटने प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून झालेल्या तरुणासोबत योद्धा उर्फ पिंट्या या संशयीताच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्धा उर्फ पिंट्या याचा विरोध होता. लग्न ठरलेल्या मुलीच्या काकाचा अर्थात योद्धा उर्फ पिंट्या याचा संशयीत आरोपींमधे समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत कळस्कर, विजय जाधव आदींनी त्याला ताब्यात घेत रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलिस करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here