खूनातील संशयितास एलसीबी पथकाकडून अटक

जळगाव : जळगाव शहराच्या समता नगर परिसरात झालेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेतील अजून एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रविण उर्फ दोध्या पिन्टया प्रेमराज शिरसाळे (रा. संभाजी नगर, जाकीर हुसेन कॉलनी प्लॉट नं १० जळगाव – मुळ रा. नागदुली म्हसावद) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 

घटनास्थळी मिळालेले पुरावे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी कुलदीप उर्फ सोनू पोपट अढाळे, रा. समतानगर, जळगाव यास दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. याच गुन्ह्यातील प्रवीण उर्फ पिन्टया उर्फ दोध्या शिरसाळे यास गोपनीय माहितीच्या आधारे वावडदा बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील उप निरीक्षक गणेश वाघमारे,  विजयसिग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, विजय पाटील, किरण धनगर, सचिन महाजन, संदिप सावळे, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here