कपडे बदलत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची तरुणीला धमकी 

जळगाव : : कपडे बदलत असतांना तरुणीचा  बनावट व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देणा-या इंस्टाग्राम खाते धारक तरुणा विरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वेष भावनेतून हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरात राहणाऱ्या तसेच फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. इंस्टाग्राम खाते धारक तरुणाने या तरुणीला व्हिडीओ पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here