जळगावसह नाशिक जिल्ह्यातील मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस

नाशिक : जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनसह मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, येवला, नाशिक शहर अशा विविध पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले  आहेत. अटकेतील चोरट्यांकडून एकुण तेरा मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांच्या पथकाच्या तपासादरम्यान मोटार सायकलीचे विविध गुन्हे उघडकीस आले आहेत.

मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयीत चोरीच्या मोटार विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे समांतर तपासादरम्यान मालेगावच्या आयुबी चौकात सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान संशयीत ईकलाख अहमद इम्तियाज अहमद (रा. ईस्लामाबाद, रविवार वार्ड, मालेगाव) यास ताब्यात घेण्यात आले.  त्याच्या कब्जातील मोटार सायकलच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल करत  आपला साथीदार जहिर अहमद अब्दुल (रा. संगमेश्वर मालेगाव) याच्या मदतीने मोटार सायकलीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.

मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव, नाशिक शहर अशा ठिकाणांवरून एकूण तेरा मोटर सायकली चोरी केल्याची दोघांनी कबुली दिली आहे. अटकेतील दोघांच्या कब्जातून 7 हिरो स्प्लेंडर, 2 होन्डा शाईन, 1 ड्रिम युगा, 1 हिरो एच. एफ. डिलक्स, 1 यामाहा एस.एस., 1 हिरो पॅशन अशा एकुण तेरा चोरीच्या मोटर सायकली (किंमत 6,25,000/-) हस्तगत करण्यात आल्या आहेत. मालेगाव तालुका, सटाणा, चांदवड, येवला तालुका, मालेगाव छावणी, जळगाव जिल्हापेठ, भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींनी चोरी केलेल्या मोटर सायकल खरेदी करणारे निसार अहमद अक्सर हुसेन (रा. देवीचा मळा, मालेगाव), मुजिब अहमद जमील अहमद (रा. संगमेश्वर, मालेगाव), फरान अहमद इम्रान अहमद (रा. मरीमाता मंदिराचे समोर, मालेगाव), शोएब मोहमद अजहर, रा. टेंशन चौक, मालेगाव, मोहमद शोएब मोहमद इद्रिस, रा. नयापुरा, काबुल चौक, मालेगाव, भिकन दादामिया पिंजारी (रा. देवीचा मळा, मालेगाव‌ यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यातील आरोपींना मालेगाव छावणी पोलीस स्टेशनला दाखल गुरनं 323/23 भादवि कलम 379 या गुन्हयात हजर करण्यात आले आहे. आरोपी ईकलाख अहमद याचा साथीदार जहिर अब्दुल हा फरार असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहेत. अटकेतील आरोपींकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेघबीर संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे, स.पो.नि. हेमंत पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, संतोष हजारे, सुनिल पाडवी, पोना देवा गोविंद, पोकॉ गिरीष बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here