तुकाराम मुंडे यांची बदली आणि चारित्र्यहननाचा प्रकार !

tukaram munde

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या राजकीय बदलीचे पडसाद उमटू लागले आहेत. श्रीमान मुंडे यांच्यासोबत इतर 15 आयएएस अधिका-यांच्या बदल्या झाल्या. तरीदेखील राज्यात तुकाराम मुंडे यांचीच प्रतिमा लोकचर्चेत दिसते. केवळ मुंडे हेच नव्हे तर त्यांच्यासारखे प्रवाहाविरुद्ध जावून नियमांवर बोट ठेवणारे बडे अधिकारी राज्यातील कोट्यावधी लोकांना आवडतात.

श्री मुंडे यांच्या बदलीबाबत आघाडीचे दैनिक लोकमतने काही बड्या माजी अधिका-यांच्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे दिल्या आहेत. त्याबद्दल या दैनिकाच्या सजग पत्रकारितेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. तथापी या सेवानिवृत्तांच्या प्रतिक्रियेचे देखील पोस्टमॉर्टम व्हायला हवे. काही प्रतिक्रिया बघता त्याला मुंडे यांच्या प्रतिमा भंजनाचा वास येतो. सत्तारुढ लोकप्रतिनिधींचे लांगुलचालनाची झलक त्यात दिसून येते. माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस, माजी प्रधान सचिव सी.एस. संगीतराव, महेश झगडे, रत्नाकर गायकवाड हे काय सुचवू बघतात हे लक्षात घ्या. पंगा की चमचेगिरी? या पैकी सेवेतील नोकरशाही दुसरा पर्याय स्विकारते. पोस्टींगसाठी लॉबींग-छुपी धनवर्षा लोकचर्चेत आहेच.

आयएएसची पॉवरफुल लॉबी आहे. त्यातही आवडते व नावडते असतात. ब्ल्यु आईड बर्डची चर्चा आठवते? नोकरशाहीच्या बाबत काही सुपातील तर काही जात्यातील म्हटले जातात. काही सुपात राहून यशस्वी कलाकार ठरतात. जात्यात जाण्यापुर्वीच सुपातून बाहेर उडी घेण्याचे एक टेक्निक त्यांनी आत्मसात केलेले असते. माजी पोलिस महासंचालक जे.एफ. रिबेरो यांची शिस्तीबाबत खासीयत आहे. देशातल्या अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्राला फर्स्ट चॉईसचा मान मिळतो. येथील काही नेते-राज्यकर्ते चांगलेच. काही महाभाग स्वार्थ बिघडला की नोकरशाही “पब्लिक सर्व्हंट” म्हणजे आमचे नोकरच अशा शब्दात ठणकावतात.तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या नागपुरातील सेवा काळात त्यांचे चारित्र्यहननाचा प्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्वत:चे कपडे स्वत: फाडून अधिका-याच्या चारित्र्यावर हल्ला करण्यासाठी महिला एखाद्या शस्त्रासारखा वापर करण्यात आल्याचा श्री मुंडे यांचा आरोप राज्यातल्या 20 लाखावर नोकरशाहीसाठी चिंतेचा विषय आहे.

कर्तव्यकठोर अधिका-यांना नामोहरम करण्यासाठी मुंडे यांनी उजेडात आणलेला नागपुरी प्रयोग चिंताजनकच आहे. त्यातून विनयभंगाचा गुन्हा नोंदवून कोणत्याही अधिकारी – कर्मचा-याला कथित आरोपीच्या पिंज-यात आणले जाते. एवढेच नव्हे तर राज्यात काही जिल्हयात काही महिला अधिकारी, कर्मचारी, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती मागू नये यासाठी विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा शस्त्र म्हणून वापर करु लागल्या आहेत. काही वर्षापुर्वी जळगावातील एका हॉस्पीटलमधे गर्भ लिंग निदान – स्त्री गर्भपात रॅकेटचे स्टींग ऑपरेशन करणा-या कार्यकर्त्यावर संबंधीतांनी  खंडणीचे गुन्हे नोंदवले होते. तेव्हा कथित अपराध्यांच्या पाठीशी कुणीतरी वजनदार आसामी होता अशी चर्चा होती.

राज्यातील समस्त महिला वर्गाचा सन्मान राखायला हवा. तथापी विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या पडद्याआड राहून कुणी रिमोट कंट्रोल चालवून गैरवापर करत असेल तर महाराष्ट्रातील जनतेने केवळ रिमोट कंट्रोल चालकांचाच नव्हे तर उपरोक्त अपप्रवृत्ती पासून सज्जनांच्या रक्षणार्थ पुढे यायला हवे यासाठीच हा लेखनप्रपंच.

subhash-wagh

सुभाष वाघ (पत्रकार जळगाव)  

8805667750

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here