लपूनछपून फिरणाऱ्या हद्दपार आरोपीस अटक

जळगाव : जळगाव जिल्ह्यातुन एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी (रा.चौधरी गल्ली पारोळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

विजय चौधरी याच्या विरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. हद्दपार करण्यात आले असूनही तो पारोळा शहरात फिरत होता. पो.नि. किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे कॉ नंदलाल पाटील, प्रमोद लांडवंजारी, किरण धनगर, पोना भगवान पाटील, राहुल बैसाणे, चापोका मोतिलाल चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here