कोयत्यासह फिरणा-या  हद्दपार आरोपीस अटक

On: March 19, 2024 5:29 PM

जळगाव : हद्दपार असतांना देखील कमरेला कोयता लावून जनमानसात दहशत निर्माण करणा-या  तरुणास शनीपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. गणेश उर्फ काल्या रविंद सोनवणे (रा. कांचन नगर जळगांव) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

पो.हे.कॉ. विजय खैरे, पो.कॉ. राहुल घेटे. पो.कॉ. राहुल पाटील, पो.कॉ. अनिल कांबळे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. त्याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. प्रमोद पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment