वि.का. सोसा.लि. मेहरुण चेअरमनपदी सुनिल वंजारी

जळगाव : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेहरुण ता. जि. जळगाव या संस्थेच्या सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी चेअरमनपदी सुनील वसंत वंजारी यांची निवड झाली आहे. व्हाईस चेअरमनपदी जयंत किसन सोनवणे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळात सुनील सुपडू महाजन, भागवत बुधो धांडे, ज्ञानेश्वर वामन नाईक, प्रमोद यशवंत नाईक, सुखदेव परशुराम सोनवणे, सुदाम दोधु पाटील, गणेश विठ्ठल सोनवणे, निरंजन जगन्नाथ पाटील, भुषण राजेंद्र सोनवणे, श्रीमती मंदाकिनी लक्ष्मण महाजन, श्रीमती सुनंदाबाई भास्कर नाईक, भागवत चावदस सानप तसेच तज्ञ संचालक पदी योगेश पुंडलिक सांगळे, जयराम नामदेव पाटील, अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे या मंडळाची निवड करण्यात आली आहे.

मेहरुण गावातील सर्व समाज बांवांचे या निवडीप्रसंगी सहकार्य लाभल्याची भावना याप्रसंगी चेअरमन सुनिल वंजारी यांनी व्यक्त केली आहे. यात सुनीलभाऊ महाजन, प्रशांतभाऊ सुरेश नाईक, गणेशभाऊ किसन सोनवणे, अशोकभाऊ सिताराम लाडवंजारी यांनी बिनविरोध प्रक्रियेसाठी सहकार्य केले. सहकार अधिकारी एस. एस. शिंदे व सचिव गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर घुगे यांचे यावेळी सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here