कुंटणखान्यावर धाड – साठ महिला ताब्यात

जळगाव : देहविक्री सुरु असलेल्या चोपडा शहरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत साठ महिलांना ताब्यात घेतले आहे. या धाडीत 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह एकुण साठ महिलांना ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली आहे. देहविक्री करणा-या आणि तसे करण्यास भाग पाडणा-या आदींचा यात समावेश आहे. चोपडा शहराच्या नविन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस झोपड्यांमधे हा व्यवसाय गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु होता असे म्हटले जाते. या धाडीत बहुतांश महिला या पर राज्यातील आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पिडीत महिलांना महिला सुधारगृहात पाठवले जाणार असून कुंटणखाना चालवणा-या महिलांविरुद्ध गुन्हा चोपडा शहर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या या महिला नेपाळ, पश्चिम बंगाल, मुंबई, आंध्रप्रदेश आदी ठिकाणच्या आहेत. चोपडा शहर  आणि परिसरातील लोकांसाठी हा कुंटणखाना नवीन नाही. पुर्वी धरणगाव रस्त्यावर हा कुंटणखाना सुरु होता. त्यानंतर झालेल्या कारवाईनंतर केवळ जागा बदलली. या कुंटणखान्यावर येणा-या ग्राहकांच्या मोटार सायकली चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते असे म्हटले जाते. मात्र नाजुक मामला आणि नाजुक ठिकाण असल्यामुळे कुणी तक्रार देत होते, कुणी तक्रार देत नव्हते. मोटार सायकलींचे चोरी होण्याचे प्रमाण का वाढीस लागले याचा शोध घेत असतांना त्यामागील वास्तव लक्षात घेत  या कुंटणखान्यावर धाड  टाकण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here