‘मी डॉन आहे, तुला उचलून नेईन’ म्हणत महिलेचा विनयभंग 

जळगाव : मी डॉन आहे, तू माझ्यासोबत नाही आली तर तुला उचलून नेईल अशी महिलेस धमकी देणा-याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील केळकर मार्केटमधे मार्केटींगचा व्यवसाय करणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेसोबत सोमवारी हा प्रकार घडला आहे. 

जळगाव शहरातील केळकर मार्केटमधील एका दुकानात संबंधित महिला कामानिमित्त गेली असता संशयित आरोपी भोला लक्ष्मण सोनवणे याने तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विनयभंग केला. मी इथला डॉन आहे, तुला उचलून नेईल असे सांगून त्याने महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने जळगाव शहर पोलिस स्टेशनला या घटने प्रकरणी भोला सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here