आयजी पथकाच्या जुगार अड्डयावरील धाडीत 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकासह स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी चोपडा नगरपालिकेच्या मागील जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या धाडी दरम्यान लक्ष्मण बावीस्कर (पंचशीलनगर, चोपडा), खुशाल बावीस्कर (कोळंबा, ता. चोपडा), अजय माळी (लोहीया नगर, चोपडा), वाल्मिक शिंदे (वर्डी, ता. चोपडा), अमोल जैन (पंकजनगर, चोपडा), हिरालाल बाविस्कर (कोळंबा, ता. चोपडा), सागर पाटील (बुधगाव, ता. चोपडा), प्रवीण बावीस्कर (कोळंबा, ता.चोपडा), प्रदीप महाजन (अडावद, ता. चोपडा), अनिल लोहार (चोपडा), सुधाकर सोनवणे (गौतमनगर, चोपडा), आकाश कोळी (कुरवेल, ता. चोपडा), योगेश भोई (होळनाथे ता. शिरपूर) आदींना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here