आजचे राशी भविष्य (13/6/2024)

आजचे राशी भविष्य (13/6/2024)

मेष : अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागेल. संघर्षातून समस्या सुटतील.

वृषभ : गरजेच्या वस्तू खरेदीवर लक्ष द्यावे लागेल. पाहुण्यांचे आगमन होवू शकते.

मिथुन : कामाच्या व्यापात दिवस भरकन निघून जाईल. यश टिकवून टिकवून ठेवणे आवश्यक राहील.

कर्क : एखाद्या मोठ्या वस्तूच्या खरेदीचा योग असेल. नातेवाईकांचे चांगले सहकार्य लाभेल.

सिंह : आळस झटकून कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. यशाचा मार्ग मोकळा होईल. 

कन्या : केलेल्या मेहनतीचे चिज होईल. नोकरदार वर्गाला चांगला दिवस राहील.

तुळ : बुद्धीचातुर्याच्या बळावर विरोधकांना नामोहरम कराल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : एखादी शुभवार्ता कानावर येईल. जुन्या समस्यांचे निवारण होईल.

धनु : नवीन ओळखी होतील. आत्मविश्वास वाढून मनोबल उंचावेल.

मकर : मान, सन्मान वाढीस लागेल. खरेदी विक्री क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.

कुंभ : फसवणुकीपासून सावधगिरी बाळगावी लागेल. व्यावसायीकांना महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल.

मीन : वादाचे विषय टाळून संवाद साधावा लागेल. हितशत्रूंपासून सावधानता बाळगावी लागेल.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here