नाशिक शहरातून मोटारसायकल चोरी करणारा जेरबंद

On: July 16, 2024 6:38 PM

जळगाव : नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. कुणाल तिवारी (एस टी वर्कशॉपमागे लक्ष्मण भाऊ नगर जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

अटकेतील कुणाल तिवारी याने दिलेल्या कबुलीनुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. साधारण दीड महिन्यापूर्वी त्याने नाशिक रोड पोलीस स्टेशन मोटरसायकल चोरी केली होती. या चोरी प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

कुणाल तिवारी याच्या ताब्यातून सुमारे 25 हजार रुपये किमतीची चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून त्याला मोटरसायकल सह नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील अधिनस्त पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील यांनी या तपासकामी सहभाग घेतला. या तपास पथकाने एकाच दिवशी ट्रॅक्टर चोरीसह या मोटरसायकल चोरीचा देखील छडा लावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment