परमिट रुममध्ये गोळीबार करणाऱ्याची पटली ओळख

On: August 28, 2024 11:47 AM

जळगाव : भास्कर मार्केट परिसरातील हॉटेल शालिमार परमिट रुम व बारमध्ये मंगळवारी रात्री गोळीबार करणाऱ्याची  ओळख पटली आहे. भूषण सपकाळे असे त्याचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. सीसीटीव्ही फुटेज मुळे गोळीबार करणाऱ्याची ओळख पटली असून या घटने प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

हॉटेल शालिमार येथे मद्यपान करणाऱ्या समुहातील एकाने जमिनीवर गोळी झाडली होती. घटना घडली तेव्हा गोळीबारीचा मोठा आवाज झाल्यामुळे हॉटेलमधे भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचवेळी गोळीबार करणाऱ्यासह त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती हॉटेल मालकास कर्मचाऱ्यांकडून समजल्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला माहीती दिली.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पुढील तपास व कारवाईला सुरुवात करण्यात आली. घटनास्थळी एक रिकामा राउंड पोलिसांना मिळून आला. तसेच या घटनेची सीसीटीव्हीत नोंद झाली. त्या आधारे  शोध घेतला असता गोळीबार करणाऱ्याचे नाव भूषण सपकाळे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment