चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरटा ताब्यात

On: December 23, 2024 3:31 PM

जळगाव : चोरीच्या पाच मोटार सायकलींसह परजिल्ह्यातील चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दिपक प्रेमसिंग सोळंके असे वरठाण ता. सोयगाव जिल्हा संभाजीनगर असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली

अजिंठा चौफुली परिसरात एक इसम चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पो.नि. संदीप पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलिस नाईक योगेश बारी, पो.कॉ. फिरोज तडवी आदींनी सापळा रचून दिपक सोळंके यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटार सायकलीसह ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

दिपक पाटील याच्या ताब्यातील मोटार सायकलीच्या चोरीबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातून तिन, संभाजीनगर येथून एक आणि अडावद येथून एक अशा एकुण पाच मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. चोरीच्या मोटार सायकली त्याच्या कब्जातून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment