कंगनाचे मुंबईतील कथित कार्यालय सिल

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतचे मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर आलेआहे. कालच महापालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी पुर्ण केली. आज कार्यालयाबाहेर नोटीस लावण्यात आली. कंगनाच्या कार्यालयाचे अवैध बांधकाम करण्यात आले आहे. तीच्या रहिवासी भागाचा वापर कार्यालयीन कामासाठी होत असल्याचे नोटीस मधे नमुद करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्या कथित कार्यालयाबाहेर ३५४ अ नुसार नोटीस डकवण्यात आली आहे.

महापालिकेच्या नोटिस मधे एकुण सात मुद्दे नमूद आहेत. इमारतीचे बांधकाम महापालिकेच्या नियमानुसार करण्यत आलेले नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम बेकायदा करण्यात आलेले आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालय दाखवण्यात आले असले तरी प्र्त्यक्षात ती जागा ये – जा करण्यासाठी वापरली जात असल्याचे मनपाच्या नोटीस मधे म्हटले आहे.

महापालिकेच्या नोटिस मधे एक छायाचित्र देखील देण्यात आले आहे. कथित कार्यालयात कोणकोणता भाग कागदपत्रांनुसार अयोग्य आहे त्याचा छायाचित्रात दर्शवला आहे. अभिनेत्री कंगना हिने जानेवारी महिन्यात या जागेत कार्यालय तयार केले होते. निवासी जागेचा वापर बदलून तिने व्यावसायिक वापर केल्याचे प्रथमदर्शनी मनपाला आढळून आले आहे. पाहणीनंतर मंजूर आराखड्याच्या आधारे महापालिकेचे पथक दोन दिवसांत आपला अहवाल तयार करतील त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here