जळगाव : रात्र गस्तीदरम्यान सुरु असलेल्या नाकाबंदीत लाखो रुपयांचा गांजा चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाला आढळला. 42 किलो 583 ग्रॅम वजनाच्या 24 लाख 69 हजार 150 रुपये बाजारमुल्याच्या गांजासह एकास अटक करण्यात आली आहे. शेख नदीम शेख बशीर असे मालेगाव येथील रहिवासी असलेल्या इसमास अटक करण्यात आली आहे.
दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रात्र गस्तीदरम्यान नाकाबंदी करत होते. मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुलीवर वाहनांची तपासणी सुरु असतांना या गांजाची वाहतुक आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देत पुढील कारवाई केली. शेख नदीम शेख बशीर यास अटक करुन त्याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील काही आरोपींनी गांजाच साठा कन्नड शहर पोलिस स्टेशन हद्दीत लपवून ठेवला असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे कन्नड शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असता छापेमारीत त्याठिकाणी देखील 450 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर,पोलीस हवालदार, राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, पोलीस नाईक भुषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, निलेश पाटील, नाना बच्चे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील, महिला पोलीस शिपाई सबा शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.