खा. धानोरकर यांनी घेतला घाटंजी तालुक्यातील समस्यांचा आढावा

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, विकास योजनेतील अडथळे आणि नागरिकांच्या अपेक्षा आदी प्रश्न आर्णी – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खा. प्रतिभाताई धानोरकर यांनी जाणून घेतल्या. खा. धानोरकर यांच्या उपस्थितीत घांटजी पंचायत समिती सभागृहात या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

सर्व संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत अधिका-यांना यावेळी दिल्या. या प्रसंगी  यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस बाळु उर्फ जितेंद्र मोघे, घाटंजी तालुका कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष रुपेश कल्यमवार आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन, घरकुल, नरेगा, वनविभाग, महसूल विभाग, पंचायत, बांधकाम, अंगणवाडी व मदतनीस भरती इत्यादी विषयी अनेक नागरिकांनी या वेळी प्रश्न उपस्थित केले. काही प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तहसीलदार घाटंजी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सुचना दिल्या. यावेळी यवतमाळ जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र शिवाजीराव मोघे, तहसीलदार विजय साळवे, पंचायत समिती गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड, घाटंजी तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश कल्यमवार, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप नरसाळे, तालुका आरोग्य अधिकारी साईनाथ भोसीकर, तालुका कृषी अधिकारी समृद्धी वांगसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पी. एच. धांडे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अरुण शास्त्रीकर, पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी गजानन राठोड, पशुसंवर्धन अधिकारी रायबोले, नरेगा कार्यक्रम अधिकारी राहुल खरतडे, पुरवठा विभागाचे मस्के या सह तालुका स्तरावरील अनेक विभाग प्रमुख उपस्थित होते. जे अधिकारी आढावा बैठकीला गैरहजर होते, अशा सर्व अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या वेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here