जळगाव : कत्तलीसाठी जाणा-या अनुक्रमे 8, 10 आणि 12 वर्ष वयाच्या गो-ह्यांचा जीव फैजपूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांच्या सतर्कतेने वाचला आहे. या गोवंशांना कत्तलीच्या उद्देशाने नेणा-या इसमास त्याच्या ताब्यातील गो-हे आणि चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
फैजपूर शहरातील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल अन्नपुर्णा नजीक तिन गो-ह्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक मैनुददीन सैय्यद, पोउनि विनोद गाभणे, सहायक फौजदार देवीदास सुरदास, पोहेकॉ ज्ञानेश्वर चौधरी, पोहेकॉ रविंद्र मोरे, पोहेकॉ अनिल पाटील, पोना विशाल मोहे, पोकॉ राहुल चौधरी, विजय परदेशी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने संशयीत वाहन अडवण्यात आले.
जहाँगीर चांदखा तडवी याच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहनातील तिघा गो-ह्यांची सुटका करण्यात आली. 1 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्या कब्जातून हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांनी यापुर्वी देखील अशाच स्वरुपाची कारवाई कैली होती. त्यावेळी त्यांच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले होते. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांनी म्हटले आहे. गुरांची अवैध कत्तल करणा-यांच्या व कत्तलीसाठी गुरांची वाहतुक करणा-यांच्या गोटात खळबळ माजली आहे.