यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने दिनांक 21 मे 2025 रोजी यवतमाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात “ऑपरेशन सिंदूर” या ऐतिहासिक लष्करी मोहिमेला समर्पित भव्य “तिरंगा यात्रा” चे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांची दूरदृष्टी, विज्ञान निष्ठा व आधुनिक भारतासाठीच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्या शुर सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली.
ही तिरंगा यात्रा “ऑपरेशन सिंदूर” मधील भारतीय लष्कराने दाखवलेल्या अद्वितीय शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. भारतीय लष्कर, नौदल व वायूदल यांच्या पराक्रमाला कृतज्ञतेने वंदन करत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम होता.
यात्रेत नागरिक, युवक, महिलावर्ग, समाजसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. “आपला सहभाग केवळ उपस्थिती नव्हे, तर भारतीय लष्कराच्या शौर्याला दिलेली आदरांजली आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी मंत्री वसंतराव पुरके, यवतमाळ जिल्हा काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, तसेच अशोकराव बोबडे, अरुण राऊत, बबलू देशमुख, संजय ठाकरे, साहेबराव खडसे, अनिल गायकवाड, कृष्णा पुसनाके, शैलेश गुल्हाने, अरविंद वाढोणकर, रमेश भिसणकर, विजय मोघे, जाफर खान, रवी ढोक, राजू चांदेकर, विकी राऊत, छोटू सवयी, नामदेव दोनाडकर, संजय गायधाने, रामराव पवार, राजू पोटे, राजेंद्र तेलंग, अंकुश मुनेश्वर, कुणाल जतकर, किशोर धामंदे, अमय घोडे, मोहन बनकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.